जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कानडीमाळी येथे आनंदनगरी आनंदात संपन्न,विविध वस्तू विकत चिमुरड्यांनी घेतला आनंद

केज/प्रतिनिधी
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कानडी माळी या ठिकाणी आनंद नगरीमध्ये बाल चिमुकल्यांनी भरभरून सहभाग घेतला.आनंद नगरीच्या उद्घाटन प्रसंगी गावातील प्रतिष्ठितपालक श्री.सुदाम राऊत,श्री. जालिंदर राऊत,श्री. ओमप्रकाश पटणे,माता पालक वर्ग,मुख्याध्यापक श्री.गिरी सर,सहशिक्षक इंगळे सर,श्रीमती जाधव मॅडम,चाटे मॅडम,देशमुख मॅडम,थाटकर मॅडम, शेलार मॅडम व घाडगे मॅडम तसेच शिक्षण प्रेमी पालक वर्ग,माजीविद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आनंद नगरीमध्ये विद्यार्थ्यांनी पॅटीस,पुरी भाजी,वडा पाव,पाव भाजी,गुलाब जामुन,विविध फळे,भेळ, चिंचा,कवठ,इडली,वडे, पाणी पुरी असे विविध पदार्थ बनवून आणले होते.प्रत्यक्षात पैशांचा व्यवहार कसा करावा? नफा तोटा,आकडेमोड, पैसे मोड,चिल्लर याचे प्रात्यक्षिक ज्ञान अगदी पहिली पासूनच्या विद्यार्थ्यांनी आनंद नगरीतून घेतले.अशा पद्धतीने आनंदगरी उत्साहात पार पडली.



