गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, जबरी चोरी प्रकरणाचा उलगडा ; एक आरोपी जेरबंद,दुसरा फरार

केज/प्रतिनिधी

केज शहरात घडलेल्या जबरी चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जलद व अचूक तपास करत उलगडा केला आहे.या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी अद्याप फरार आहे.दि.२३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६-१५ वाजण्याच्या सुमारास समतानगर येथील बालासाहेब सोपानराव घुले हे आपल्या दुकानाकडे जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांना अडवून मोबाईल फोन व रोख २००० रुपये जबरीने हिसकावून नेले होते.या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४९/२०२६ नुसार दाखल करण्यात आला होता.

घटनेची गांभीर्याने दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली.गुप्तमाहिती, तांत्रिक विश्लेषण व सतत पाठलागाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला.या दरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून आरोपी आवेज खाजा शेख रा. कोकिसपीर,केज याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने आपल्या साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीची मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.यागुन्ह्यातील दुसरा आरोपी सोहेल मोहम्मद शेख रा. अजिजपुरा,केज हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काॕवत,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम, पोलीस निरीक्षक शिवाजी बास्टे,स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने,पोलीस हवालदार महेश जोगदंड, पोलीस हवालदार दिलीप गीते तसेच चालक पोलीस हवालदार गणेश मराडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे केज शहरातील गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!