गुटका व पानमसाल्याची चोरून विक्री करताना एक जण जेरबंद,१ लाख १८ हजाराचा मुद्देमाल जप्त

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील कुंबेफळ,धनेगाव व सारणी आनंदगाव परिसरात राज्य शासनाने बंदी घातलेल्या गुटखा व पान मसाल्याची स्कुटी वरून चोरून विक्री करताना शेख सादेक अब्दुल समद रा.केज यास जेरबंद करून त्याच्या ताब्यातील स्कुटी सह,गुटखा,पान मसाला मिळून एकूण १ लाख १८ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.केज येथील शेख सादेक अब्दुल समद रा. केज हा आपल्या स्कुटी वरून केज तालुक्यातील कुंबेफळ,धनेगाव,सारणी आनंदगाव परिसरातील खेडेगावातील किराणा दुकान व पानटपरी चालकांना राज्यशासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पानमसाल्याची चोरून विक्री करीत होता.
रविवारी दुपारी सारणी फाट्यावर गुटखा व पान मसाल्याची चोरून विक्री करीत असताना त्याला युसूफवडगाव पोलिसांनी ताब्यात घेवून पोलीस धनंजय कारले यांच्या फिर्यादीवरून शेख सादेक अब्दुल समद रा. केज याच्या विरुद्ध युसूफवडगाव पोलिसात गून्हा नोंद करण्यात आला.पोलीस निरीक्षक. मच्छिन्द्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अनिल बिक्कड हे पुढील तपास करीत आहेत.
दोन दिवसाची पोलीस कोठडी
या प्रकरणातील आरोपी शेख सादेक अब्दुल समद रा केज यास सोमवारी दि.२४ मार्च रोजी केज न्यायालया समोर हजर केले आसता त्याला दि. २५ मार्च पर्यंत दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत.

