गुन्हेगारीसामाजिक

केज पोलिसांची मोठी कारवाई ; हॉटेल न्यू शिवनेरी परिसरात अवैध दारू साठ्यावर छापा

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील मसाजोग परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने मोठी कारवाई केली आहे.या छाप्यात हजारो रुपयांचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहिती नुसार,१४ एप्रिल २०२६ रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.वेंकटराम यांना मसाजोग येथील हॉटेल न्यू शिवनेरीच्या बाजूला असलेल्या पत्रा शेडमध्ये बेकायदेशीर दारू साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिले.

पोलिसांची कारवाई आणि जप्त मुद्देमाल

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचारी पोह / ९९६ बाळासाहेब,पोह/१३८४ विकास आणि पोना/१०३५ अनिल यांनी दोन पंचासमक्ष सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी तेथे विक्रीसाठी साठवून ठेवलेला देशी,विदेशी दारू आणि बिअरचा साठा आढळून आला. पोलिसांनी या कारवाईत एकूण १९,८६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपीवर गुन्हा दाखल

या प्रकरणी राजेंद्र श्रीमंत पोपळे (रा.मसाजोग,ता. केज) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस हवालदार विकास (बं.नं. १३८४) यांनी दिलेल्या तक्रारी वरून ही कायदेशीर प्रक्रिया पार पडली.

वरिष्ठांच्या मार्गदर्शना खाली सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.वेंकटराम यांच्या नेतृत्वात पार पडली.या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून,अशा कारवाया पुढेही सुरू राहतील असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!