सामाजिक

महालोकप्रियता जनसेवा पुरस्काराने शिवाजी दादा ठोंबरे सन्मानित 

केज/प्रतिनिधी

पुणे येथे साप्ताहिक महालोकप्रियता या वृत्तपत्राचा भव्य प्रकाशन सोहळा व स्टार २४ न्यूज मराठी चॅनेलचा ५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील विविधक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.त्यात बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र उंदरी ता.केज येथील शिवाजी दादा ठोंबरे यांना “महालोकप्रियता जनसेवा पुरस्कार” प्रदान करण्यात आला. आपल्या समाजाप्रती असलेल्या निस्वार्थ सेवाभाव,कर्तव्य निष्ठा व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय प्रेरणादायी कार्याबद्दल “महालोकप्रियता जनसेवा प्रेरणा पुरस्कार -२०२६” देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

छावा मराठा संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे, महिलांचे, वंचित घटकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांच्या या कामाची दखल घेऊन महा लोकप्रियता वृत्तपत्राचे संपादक संतोष गोतावळे व सहसंपादक दत्तात्रय मुजमुले यांनी जनसेवा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे.त्यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल राजकीय, सामाजिक मंडळी, मित्रपरिवार,नातेवाईक यांच्यासह सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!