आई वडीलांच्या वचनाचे पालन केल्यास आपण केलेला निश्चय पूर्ण होतो – ह.भ.प.इंदुवासीनी महाराज

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील देवगांव येथील माजी पोलीस पाटील कै. बाबुराव माधवराव मुंडे यांची २७ वी तर कै. लक्ष्मीबाई बाबुराव मुंडे (पाटील) यांच्या ९ व्या पुण्यतिथी कार्यक्रमा प्रसंगी बोलताना ह.भ.प.त्रिविक्रमानंद शास्त्री इंदुवासिनी (पिंपळनेरकर) महाराज म्हणाले की,कै.लक्ष्मीबाई बाबुराव मुंडे यांची तीनही मुले व दोन मुली खुप भाग्यवान आहेत.
त्यांनी जिवंतपणी ही आई वडीलांची सेवा करुन पून्हा त्यांच्या पश्चातही गेल्या २७ वर्षापासुन आपल्या आई वडीलांची पुण्यतीथी करुन मानवता जागृत वचनाचे पालन करत आहेत.त्यामुळे त्यांनी केलेला निश्चय हा पूर्ण होतो असे महाराज यावेळी म्हणाले.या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व महाराज मंडळीनी कै.आण्णा व आक्का यांना विनम्र अभिवादन करुन विक्रमबप्पा मुंडे,शशिकांत नाना मुंडे, रमाकांत बापू मुंडे व दोन मुलींना आशिर्वाद दिले.
केज तालुक्यातील देवगांव येथील माजी पोलीस पाटील कै. बाबुराव माधवराव मुंडे यांची २७ वी तर कै. लक्ष्मीबाई बाबुराव मुंडे (पाटील) यांच्या ९ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम दि.२मार्च सोमवार रोजी आयोजित केला होता. यावे॓ळी ह.भ.प. त्रिविक्रमानंद शास्त्री इंदुवासिनी पिंपळनेरकर
यांचे सुश्राव्य असे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.या ठिकाणी विक्रमबप्पा मुंडे शशिकांत नाना मुंडे, रमाकांत बापू मुंडे यांनी कै.आण्णा आक्कांच्या प्रतिमेचे पुजन केले. यावेळी ह.भ.प.रतन महाराज सासुरेकर, ह.भ. प.श्रीराम महाराज विडेकर,ह.भ.प.भगवान महाराज वरपगांवकर, ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज शास्त्री आंधळेवाडी, ह.भ.प. तुकाराम महाराजआंधळे आंधळेवाडी,ह.भ.प. ज्ञानोबा माऊली महाराज आ.बरड,ह.भ.प. नारायण महाराज उत्रेश्वर पिंप्री,ह.भ.प.केशव महाराज शास्त्री टाकळी, ह.भ.प.लक्ष्मण महाराज इनामदार येवता,ह.भ.प. तुकाराम महाराज लाड बरड या महाराज मंडळींनी कै.बाबुराव (आण्णा) मुंडे व कै.लक्ष्मीआक्का विनम्र अभिवादन करुन त्यांच्या तिन्ही मुला मुलींना आशिर्वाद दिले.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व महाराज मंडळींचा व भजनी मडंळी व आलेले पाहुणे मंडळी राजेश कराड, केंद्रे,रमेशराव आडसकर, महादेव आप्पा चौरे, अंकुशराव इंगळे,संतोष हांगे,त्रिंबकराव हांगे,दत्ता धस,बप्पासाहेब घुगे, सुनिल गलांडे सह अनेक मान्यवरांचा सत्कार शशिकांत नाना मुंडे, विजयकांत मुंडे,रमाकांत बापू मुंडे,भास्कर मुंडे व अतुल मुंडे,अमित मुंडे, मधुर मुंडे यांनी केला.
यावेळी केजच्या माजी आ.सौ.संगीताताई ठोंबरे यांचा सत्कार सौ. उषाताई मुंडे यांनी केला. या कार्यक्रमासाठी केज तालुक्यातील व विडा जि.प.सर्कल मधील अनेक गावातील नागरीक मोठ्या संख्येंने उपस्थित होते.या कार्यक्रमाला आलेल्या सर्व पाहुण्यांचे व ग्रामस्थांचे आभार ह.भ.प.केशव शास्त्री महाराज घुले टाकळीकर यांनी मुंडे परिवाराच्या वतीने मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजयकांत मुंडे, अमित मुंडे,अतुल मुंडे,मधुर मुंडे, यांनी परिश्रम घेतले. महाप्रसादाच्या पंगतीने या कार्यक्रमाची सांगता झाली.



