आरणगाव येथे ह.भ.प. महंत भगवान महाराज शास्त्री यांच्या अमृततुल्य किर्तनाने काल्याची सांगता व गिरीजादेवी मुर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील आरणगाव येथे गेल्या वर्षाची परंपरा अखंडित ठेवत गावकऱ्यांनी तसेच यावेळी गिरीजादेवी मुर्ती प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहाने सहभागी सात दिवसांपासून चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता शिवरामपुरी मठ संस्थानचे मठाधिपती ह.भ.प.महंत भगवान महाराज शास्त्री यांच्या अमृततुल्य कीर्तनाने सांगता संपन्न झाली.तसेच परिसरातील व राजकीय,सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी गावकऱ्यांच्या वतीने गेल्या सात दिवसांपासून गावामध्ये सप्ताह चालू होता.
या सप्ताहासाठी सात दिवस टाळकरी, मृदंगाचार्य,विणेकरी यानी मनोभावे सेवा केल्याने सर्वांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.यावेळी महाराजांनी गावकऱ्यांचे कौतुक करून असेच कार्य आपल्या हातून होवो अशी इच्छा व्यक्त केली हा अनोखा कार्यक्रम आपण आज या ठिकाणी पहिल्यांदा पाहत असल्याचेही त्यांनी मत व्यक्त केले.
जमलेल्या भाविकांना व्यसनापासून मुक्त व्हा सल्ला महाराजांनी दिला, कारण व्यसनापासून अनेकांचे संसार उध्वस्त झालेले आहेत.यामुळे जमलेले सर्व भाविक भक्तांना व्यसनाच्या आहारी न जाता परमार्थात येऊन आपले आयुष्य सुखीसमाधानाने जगावे असा संदेश यावेळी महाराजांनी दिला.व आरणगाव येथील गिरीजामंदिर परिसरात संपन्न झाला.



