कृषीसामाजिक

बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ए.आय.कृषी माहिती केंद्र उभारा – प्रा. बबनराव आंधळे

बीड/प्रतिनिधी

शेती क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोडदेण्याची वेळ आली असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ए. आय.(आर्टिफेशियल इंटेलिजन्स) आधारित कृषी माहिती व मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात यावेत अशी मागणी ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी केली आहे या ए.आय आधारित तंत्रज्ञानामुळे कृषी कृषी माहिती केंद्रामुळे शेतकऱ्यांना हवामान अंदाज,पीक नियोजन,कीड रोग नियंत्रण,बाजार भाव सहज समजेल डिजिटल तंत्रज्ञानामुळे उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पादन वाढीस चालना मिळेल. ठिबक सिंचन योजनेचा संदर्भ देताना त्यांनी स्पष्ट केले की, आतापर्यंत आपण ठिबक दिले मात्र आता शेतकऱ्यांना अनुदानित माती आद्रता हे सर्व स्मार्ट सिंचन प्रणाली देणे आवश्यक आहे.

सेन्सर च्या माध्यमातून पाण्याचा नेमका वापर होईल विजेची बचत होईल आणि उत्पादन क्षमता वाढेल कृषी संशोधनाबाबत बोलताना त्यांनी राहुरी आणि अकोला येथील कामाचा उल्लेख केला मात्र राज्यातील इतर कृषी विद्यापीठांमध्ये संशोधना साठी आवश्यक मनुष्य बळाची कमतरता असल्याचे नमूद केले नवीन वाहन विकास हवामान बदलाशी सुसंगत संशोधन आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ देणाऱ्या प्रकल्पांना गती देण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरावीत अशी मागणी त्यांनी विशेषतः तंत्रज्ञान स्मार्ट सिंचन आणि संशोधन बळकटी या त्रिसूत्री वर राज्याची राज्याची प्रगती अवलंबून आहे. शेतकऱ्यांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून प्रत्येक तालुक्याला ए.आय कृषी माहिती केंद्र उभारावेत असे आवाहन ग्रामीण युवक संघटनेच्या वतीने प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!