
केज/प्रतिनिधी
बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केज संचलित,साने गुरुजी निवासी विद्यालयाची विद्यार्थिनी कु.स्वाती श्रीकिशन चौरे हिची १४ वर्ष मुलींच्या महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली आहे.दि.२ जानेवारी २०२६ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यस्तरीय १४ वर्ष वयोगट मुलींच्या शालेय सॉफ्टबॉल स्पर्धा अंधेरी,मुंबई येथे संपन्न झाल्या.या स्पर्धेत साने गुरुजी निवासी विद्यालयाचा १४ वर्ष मुलींचा संघ सहभागी झाला होता.या संघातील कु.स्वाती श्रीकिशन चौरे हिची महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघात निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्याचा संघ राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत आहे.या विद्यार्थिनीची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाल्याबद्दल बीड जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.अरविंद विद्यागर सर सॉफ्टबॉलचे जिल्हा क्रीडा मार्गदर्शक सतीश राठोड सर बेसबॉल चे जिल्हा क्रीडा मार्गदर्शक रेवन्नाथ शेलार सर,तालुका क्रीडा अधिकारी अनिकेत काळे सर,केज तालुका क्रीडा अधिकारी राखी यादव मॅडम,संघटनेचे अध्यक्ष श्री.दिनकर थोरात सर, बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ संस्थेचे अध्यक्ष ॲड. उद्धवराव कराड सर, श्री.कापसे सर, मार्गदर्शिका डॉ.कविता कराड गित्ते मॅडम या सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री.रामदास सानप सर,श्री.तरकसे सर,कृष्णा गित्ते,केशव कराड, श्री.साखरे सर,श्री. घुले सर श्रीमती कांदे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले होते.सदर विद्यार्थिनींचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.



