शैक्षणिक

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कानडीमाळी येथे बालसभा उत्साहात संपन्न 

केज/प्रतिनिधी

दि.३ जानेवारी रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कानडी माळी या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी बालसभेचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनीच सर्व कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन केले. भाषण स्पर्धा व गायन स्पर्धा घेण्यात आल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्षा सातवीतील विद्यार्थीनी पल्लवी खाडे ही होती तर प्रमुख पाहुणे म्हणून गावातील व्यवस्थापन समिती अध्यक्षा पांचाळ रेणुका ताई,माजी व्यवस्थापन समिती अध्यक्ष,विजय राऊत, किरण राऊत,मेजर काका गावातील शिक्षण प्रेमी नागरीक,अंगणवाडी ताई छायाताई राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्या साठी सातवीच्या वर्ग शिक्षिका श्रीमती देशमुख मॅडम,मुख्याध्यापक गिरी सर,जाधव मॅडम,चाटे मॅडम,दुबाले मॅडम,घाडगे मॅडम व शेलार मॅडम यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चि.अभय पटणे व चि. राम राऊत यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!