सामाजिकसाहित्यिक

आनंद ग्रामीण विकास व स्वानंद सार्वजनिक वाचनालयात जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न

केज/ प्रतिनिधी

आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण,आनंदगांव ता. केज जि.बीड व स्वानंद सार्वजनिक वाचनालय, आनंदगांव ता.केज जि. बीड यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिन महिला मेळावा, महिला वाचक मेळावा, ग्रंथप्रदर्शन,कविता लेखन व वाचन स्पर्धा,क्रिकेट स्पर्धा घेवून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

सर्व प्रथम मयुरी गायकवाड, वेदिका गायकवाड, अनुश्री गायकवाड, वेदिका गायकवाड, श्रावणी पौळ,अक्षरा सौदागर,अंकिता गायकवाड यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजामाता व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन व वंदन करण्यात आले व विविध कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.अध्यक्षस्थानी अक्षरा सौदागर या होत्या.

सकाळी ९ ते ५ पर्यंत ग्रंथप्रदर्शन चालले. सकाळी ९ ते १० या वेळात कविता लेखन व वाचन स्पर्धा घेण्यात आल्या. त्यानंतर १० ते १२ या वेळात महिला मेळावा व महिला वाचक मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात वेदिका गायकवाड,मयुरी गायकवाड,श्रावणी पौळ, अनुश्री गायकवाड, वेदिका गायकवाड, अंकिता गायकवाड व दोन्ही संस्थेचे संस्थापक, जेष्ठ विचारवंत,जेष्ठ समाजसेवक,महाराष्ट्रा तील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते प्राचार्य,डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.अध्यक्षीय समारोप अक्षरा सौदागर यांनी केला.

कविता लेखन व वाचन स्पर्धेतही अक्षरा सौदागर,वेदिका गायकवाड,मयुरी गायकवाड,श्रावणी पौळ, सोहम गायकवाड, अनुश्री गायकवाड,विक्रम गायकवाड,आनंद गायकवाड, यशवंत सौदागर,बालाजी टिंगरे, समर्थ गायकवाड,अमर पौळ यांनी स्वरचित कविता लेखन व वाचन केले.त्यानंतर १२ ते २ या वेळात मुलांसाठी क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या.नंतर ५ पर्यंत ग्रंथप्रदर्शन चालले.५ वाजता बक्षीस वितरणाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!