निवडणूक

येवता जिल्हा परिषद सर्कलमध्ये डॉ.योगिनी थोरात यांची होणार एन्ट्री?आयात उमेदवार मतदार स्वीकारतील का हा मोठा प्रश्न?

केज/प्रतिनिधी

येवता जिल्हा परिषद सर्कलमध्ये राजकारणाला अचानक वेग आला आहे. स्थानिक राजकारणातील नवे व्यक्तिमत्त्व म्हणून योगिनी थोरात यांना पाहिले जाते.या जिल्हा परिषद सर्कलमध्ये निवडणूक लढण्याची शक्यता आहे.त्यांनी पूर्वी होळ जिल्हा परिषद सर्कल मधून निवडणूक लढवली होती.पण सध्या होळ जिल्हा परिषद सर्कल अनुसूचित जाती साठी राखीव असल्यामुळे त्यांना स्वतःचे सर्कल बदलावे लागत आहे.

त्यांच्या निर्णयामुळे सध्याच्या राजकीय समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.डाॕ. योगिनी थोरात यांची ओळख सामाजिक कामात हातभार लावणारी,कार्यशील नेतृत्व म्हणून होत आहे. महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि आरोग्य विषयक प्रश्नावर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.त्यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.तथापि, सर्वात मोठा प्रश्न असा आहे की,येवता सर्कल मधील लोक आयात उमेदवार स्वीकारतील काय?

स्थानिक पातळीवर काही मतदार अजूनही पारंपरिक नेतृत्वालाच पसंती देत असल्याचे बोलले जात आहे. तर काही लोकांमध्ये थोरात यांच्याबद्दल सकारात्मक चर्चा रंगली आहे.आगामी काळात त्यांचा प्रचार, मतदारांशी संवाद आणि स्थानिक प्रश्नांवरचे ठोस उपाय याच्यावर त्यांच्या स्वीकारार्हतेचा कौल ठरेल,असे तज्ज्ञांचे मत आहे.येणाऱ्या निवडणुकीत डॉ.योगिनी थोरात यांच्यासमोर विश्वास जिंकण्याचे मोठे आव्हान असणार आहे. पण लोकसंग्रह आणि कार्यकर्ता बळ यांच्या जोरावर त्या हे समीकरण कितपत बदलू शकतात, हे पाहण्यासाठी संपूर्ण सर्कल उत्सुक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!