
केज/प्रतिनिधी
अंबाजोगाई नगरपरिषद निवडणुकीत बहुमताने विजय संपादन करणारे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आदरणीय नंदकिशोरजी (काकाजी) मुंदडा तसेच सर्व विजयी नगरसेवक यांचा आज पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री, लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांनी अंबाजोगाई येथील आई निवास येथे स्नेहपूर्ण भेट घेऊन अभिनंदन केले.
या प्रसंगी पंकजाताईंनी विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक कौतुक करताना सांगितले की, “हा विजय जनतेच्या विश्वासाचा कौल आहे. अंबाजोगाई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक,लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासन देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.” त्यांनी नगरपरिषदेच्या माध्यमा तूनस्वच्छता,पाणीपुरवठा, रस्ते,आरोग्य,पर्यावरण संवर्धन तसेच पशुसंवर्धन यांच्या संबंधित योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर विशेष भर दिला.
पंकजाताईंनी पुढे बोलताना संघटनात्मक एकोपा जपण्याचे, सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे व शासनाच्या विविध विकास योजना तळागाळातील नागरिका पर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे उपस्थितांमध्ये नवचैतन्य संचारले असून विजयाचा आनंद द्विगुणीत झाल्याचे चित्र दिसून आले.
या भेटी दरम्यान नमिताताई अक्षय मुंदडा यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांनी मिळून शहराच्या विकासा साठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.ही भेट अंबाजोगाई च्या राजकीय,सामाजिक जीवनात नवे पर्व सुरू करणारी ठरेल,असा विश्वास उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला.



