सामाजिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी गुलामीच्या बेड्या तोडून माणसाला माणूस बनविले – पप्पू कागदे

केज/प्रतिनिधी

उपेक्षित समाज आणि स्त्रियांना मनुवादने पशु पेक्षाही हीन समजले होते त्या समाजाला माणूस म्हणून सन्मान आणि अधीकार मिळवून दिले. महाजनांची जयंती केज शहरामध्ये जयभीम महोत्सव साजरा करून होते.दिपक कांबळे युवा मंचच्या वतीने होत असलेला जयभीम महोत्सव आणि त्यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असल्याचे गौरव पप्पू कागदे यांनी केला तर दीपक कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने त्यांचे कार्य हे प्रबोधनाच्या माध्यमातून पोहोचविण्याचे काम राष्ट्रीय प्रबोधनकार राहुल अन्विकर हे करीत असल्याचे सांगितले.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त रिपाइं चे केज तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय प्रबोधनकार राहुल अन्विकर यांचा भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटक पप्पू कागदे तर अध्यक्ष विष्णू भाऊ घुले हे होते.तसेच रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड,कार्यालयीन सचिव विष्णू जोगदंड, जिल्हा संघटक रवी जोगदंड यांच्या सह शेकापचे भाई मोहन गुंड, माजी नगरसेवक कपिल मस्के,तालुका सर चिटणीस गौतम बचुटे, ज्येष्ठनेते दिलीप बनसोडे, आयटी सेलचे सुरज काळे,हरीश गायकवाड, प्रशांत हजारे,सचिन मस्के,हरेंद्र तुपारे,संभाजी हजारे,दादाराव धेडे, विनोद गायकवाड हे उपस्थित होते. राहुल अन्विकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग गीतांच्या माध्यमातून सादर करताना प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले तर माता रमाईच्या जीवनावर प्रबोधन करताना स्त्रियांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

हा कार्यक्रम दीपक कांबळे युवा मंचचे समन्वयक रणजीत कांबळे आणि त्यांचे सहकारी रोहीत कांबळे, शोयब शेख,प्रदिप शिनगारे,राहुल काळे, निसार शेख,अबुबकर शेख,सुशिल कांबळे, गौतम गंडले,रितेश बचुटे, समाधान तुपारे,संगम कांबळे,सुमित कांबळे, बाळासाहेब कांबळे, उत्कर्ष काळे यांच्या सुंदर आणि नेटक्या संयोजना सह संपन्न झाला.उद्घाटन कार्यक्रमाचे संचलन आणि आभार ज्येष्ठ नेते दिलीप बनसोडे यांनी केले.तर या कार्यक्रमाला केज शहर आणि परिसरातील भीम अनुयायी,महिला या मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!