सामाजिक

साळेगाव येथील केंद्र प्रमुख सूर्यकांत काळे यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा शनिवारी 

केज/प्रतिनिधी

येथील पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे केंद्रप्रमुख श्री. सूर्यकांत तुकाराम काळे यांचा प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर सेवानिवृत्ती निमित्त भव्य’सेवापूर्ती सत्कार सोहळा शनिवार, दि.२५ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्याचे आयोजन सकाळी ११-०० वाजता निसर्ग मंगल कार्यालय, माळेगाव चौकाच्या पुढे, कळंब-अंबाजोगाई रोड, सुकळी येथे करण्यात आले आहे.

प्रमुख पाहुणे आणि आशीर्वाद

या कार्यक्रमाला ह.भ.प.श्री.प्रकाश महाराज बोधले अध्यक्ष, अखिल भारतीय वारकरी मंडळ महाराष्ट्र राज्य आणि ह.भ.प.गणेश जोगदंड महाराज अध्यक्ष,संत एकनाथ शांतीधाम,साळेगाव यांचे पावन आशीर्वाद लाभणार आहेत.या सोहळ्याचे उद्घाटन खासदार श्री.बजरंग बप्पा सोनवणे यांच्या शुभहस्ते होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षपद गट शिक्षण अधिकारी श्री.सुनील केंद्रे हे भूषविणार आहेत.

मान्यवरांची उपस्थिती

या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.यामध्ये प्रामुख्याने श्री. रमेशरावजी आडसकर, श्री.कैलास पाटील,श्री. श्री.राजेंद्रजी राऊत,श्री. दीपक अरुण वैद्य यांच्या सह अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे.या कार्यक्रमाचे भव्य स्वरूपात नियोजन करण्यात आले आहे.

सूर्यकांत काळे यांनी आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात साळेगाव केंद्रातील शैक्षणिक प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी साळेगाव केंद्रातील सर्व मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षिका,केंद्र आणि ग्रामस्थ साळेगाव व मित्र परिवाराच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या गौरवसोहळ्यास सर्व स्नेहीजन,ग्रामस्थ आणि शिक्षण प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन साळेगाव केंद्रातील समस्त शिक्षक वृंद व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!