गुन्हेगारीसामाजिक

महावितरणची महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात,ए सी बी ची धडाकेबाज कामगिरी 

बीड/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसत असून आता महिला अधिकारी देखील त्यालाअपवाद राहिलेल्या नाहीत.आष्टी येथील महावितरण कार्यालया तील सहायक अभियंता कोमल शिंदे यांना १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवार दि.२१ एप्रिल रोजी बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार,तक्रारदाराच्या सोलर प्रकल्पाची पडताळणी करून देण्यासाठी कोमल शिंदे यांनी मोबदल्याच्या स्वरूपात १८ हजार रुपयांची लाच मागितली होती.तक्रारदाराने या बाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली.तक्रारीची पडताळणी करून एसीबीने सापळा रचला. दरम्यान,मंगळवार दि.२१ एप्रिल रोजी तक्रारदारा कडून १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहायक अभियंता कोमल शिंदे यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली.ही कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्यासह त्यांच्या पथकाने केली. या घटनेमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली असून पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!