क्रिडाशैक्षणिक

साने गुरुजी निवासी विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश 

केज/प्रतिनिधी

दि.23 नोव्हेंबर 2025 रोजी युवक व क्रीडा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धा 17 वर्ष वयोगट संपन्न झाल्या.यात साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या मुलींच्या संघाने छत्रपती संभाजी नगर ग्रामीण,छत्रपती संभाजी शहर,परभणी ग्रामीण,परभणी शहर या संघाना पराभूत करून स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.सदर मुलींचा संघ दि.26 नोव्हेंबर 2025 पासून नागपूर येथे होणाऱ्या राज्य स्तरीय स्पर्धेत छत्रपती संभाजी नगरचे नेतृत्व करणार आहे.

या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री.रामदास सानप सर,सहाय्यक दीपक साखरे सर,श्रीमती कांदे मॅडम, चि.केशव कराड,चि.कृष्णा गित्ते यांचे मार्गदर्शन लाभले होते.याबद्दल बीड जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर सर,मार्गदर्शक रेवन्नाथ शेलार सर, अनिकेत काळे सर,सतीश राठोडसर संस्था अध्यक्ष ॲड. उद्धवराव कराड, प्राचार्य व मार्गदर्शिका गित्ते मॅडम, कापसे सर, सर्व शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!