आंतरराष्ट्रीय लेक्रोस खेळामध्ये केजची कन्या कु.साक्षी कराड चा डंका, सुवर्णपदक पटकावत भारताने उडविला पाकचा धुव्वा

केज/प्रतिनिधी
केज येथील बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केज संचलित साने गुरुजी निवासी विद्यालयातील कु.साक्षी उद्धवराव कराड ने दि.१ ते ४ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान सऊदी अरेबिया ची राजधानी रियाद येथे पार पडलेल्या आशियाई लेक्रोस स्पर्धेत भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे.
अंतिम सामन्यात पाकिस्तान चा २२ – ०५ असा धुव्वा उडवत भारतीय महिला संघाने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.या विजयी संघात केजची कन्या कु.साक्षी उद्धवराव कराड याने इन मध्ये खेळुन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.त्यांच्या या सुवर्ण यशाचे क्रीडा प्रेमींकडुन भरभरून कौतुक होत आहे.विशेष म्हणजे भारतीय क्रीडा इतिहासात प्रथमच महिला आणि पुरुष आशा दोन्ही लेक्रोस संघांनी एकाच वेळी सुवर्णपदक मिळवून इतिहास निर्माण केला आहे.
या विजयाशमुळे महिला व पुरुष या दोन्ही लेक्रोस संघाना २०२८च्या आॕलंपिक मध्ये लेक्रोस खेळाचा समावेश असल्याने भारताचा हा विजय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.या यशाबद्दल कु.साक्षी कराड चे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस आदित्य दादा पाटील,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे,युवा नेते पशुपतीनाथ दांगट,संस्थेचे अध्यक्ष अँड.उद्धवराव कराड,उपाध्यक्ष राजेश कापसे,संकुल प्राचार्या डॉ.कविता कराड,प्रविण कुमार शेप,प्रताप मोरे सर,बाळासाहेब ठोंबरे, संगिता साळवे,साने गुरुजी निवासी विद्यालय केज परिवारातील सर्व सदस्यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.



