सामाजिक

श्री स्वामी समर्थ केंद्र सारणी(आनंदगाव) येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न,सद्गुरू प पू मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल त्र्यंबकेश्वरचा स्तुत्य उपक्रम

केज/प्रतिनिधी

परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र आदरणीय दादासाहेब यांच्या आदेशानुसार सद्गुरू प.पू.मोरे दादा चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल त्र्यंबकेश्वर आयोजित मोफत आरोग्य तपासणी नाडी परीक्षण व सर्व रोग निदान शिबिर केज तालुक्यातील सारणी (आनंदगाव) मोठ्या प्रतिसादात संपन्न झाले.

या शिबीराची सुरुवात दिपप्रज्वलन व धन्वंतरी पूजन करुन झाले यावेळी सद्गुरू प.पू.मोरे दादा चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल त्र्यंबकेश्वरचे डॉ.मोहनराव गौरकर,डॉ.श्रीकांत सलोने,सरपंच पती संतोष अण्णा सोनवणे,ग्राम पंचायत सदस्य गोकुळ सोनवणे,शालेय समितीचे अध्यक्ष अशोकगायकवाड तसेच प.पू.गुरु माऊली अण्णासाहेब मोरे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कॅन्सर रिसर्च सेंटरचे डॉक्टर टीम, आरोग्य दूत जिल्हा प्रतिनिधी शिवशंकर भंडारे इत्यादी उपस्थित होते.यावेळी सरपंच पती अण्णा संतोष सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

डॉ. मोहनराव गौरकर,यांनी सद्गुरू प पू मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल त्र्यंबकेश्वर,जनकल्याण योजना व आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. यावेळी गावातील किरण सोनवणे, विकास सोनवणे, जनार्धन सोनवणे,धनंजय सोनवणे, शामसुंदर सोनवणे सर्व ग्रामस्थ महिला, पुरुष, नागरिक, सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.याशिबीराचे सुत्रसंचलन व नियोजन श्रीराम सोनवणे यांनी केले.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी स्थानिक सर्व ग्रामस्थ व कार्यरत सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!