
बीड/प्रतिनिधी
राज्यातील शेती क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी तसेच कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडूनआपत्कालीन व दीर्घकालीन उपाय योजना राबविण्यात येत असून त्या अनुषंगाने शेती कर्जाची माहिती शासना च्या पोर्टलवर भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे या प्रक्रियेसाठी सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांचे केवायसी करणे अनिवार्य असल्याने आधार क्रमांक आवश्यक आहे.
त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी तातडीने आपले आधार कार्ड संबंधित संस्थाकडे जमा करावेत असे आव्हान ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी केले आहे. जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यात आलेला आहे मात्र बहुतांश शेतकऱ्याचे आधार कार्ड संबंधित संस्थाकडे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे.यामुळे केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी निर्माण होत आहेत शासनाच्या पोर्टलवर अचूक व संपूर्ण माहिती भरण्यास अडचणी येत आहेत शेती कर्ज पुनर्रचना थकीत कर्जा बाबत निर्णय तसेच भविष्यातील शासकीय योजना याचा लाभ शेतकऱ्यांना सुरळीतपणे मिळावा यासाठी केवायसी अत्यंत महत्त्वाची आहे.
त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था किंवा बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके कडून कर्ज घेतले आहे त्यांनी आपले आधार कार्ड संबंधित गट सचिव व बँकेच्या शाखाधिकार्या कडे त्वरित जमा करावेत असे आवाहन करण्यात आले आहे मयत शेतकऱ्याच्या वारसांनी संबंधित सेवा सहकारी संस्था व बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत वासाची नावे नोंदवून आवश्यक त्या कागद पत्रासह आधार कार्ड सादर करावेत असेही आव्हान ग्रामीण युवक संघटनेच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना करण्यात येत आहे व या बाबीचा गांभीर्यपूर्वक विचार करून सर्व शेतकऱ्यांनी या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देऊन वेळेत केवायसी पूर्ण करावी जेणेकरून शासनाच्या योजनेचा लाभ कोणत्याही अडथळ्याशिवाय आपणास मिळू शकेल असे आवाहनही बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ग्रामीण युवक संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.



