क्रिडासामाजिक

केजमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार,आमदार चषक टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन ; विजेत्याला मिळणार टीव्हीएस रायडर गाडी

​केज/प्रतिनिधी

केज मतदारसंघात शहरी व ग्रामीण भागातील क्रीडा प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. युवा नेते अक्षयभैय्या मुंदडा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून,अक्षय मुंदडा मित्र मंडळ व नंदकिशोर मुंदडा युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य खुल्या ‘आमदार चषक’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक म्हणून आकर्षक टीव्हीएस रायडर (TVS Raider) मोटारसायकल देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य आयोजक सुनील घोळवे,शरद इंगळे,महादेव सुर्यवंशी, राहुल गदळे,खदीर कुरेशी,शिवाजी पाटील, अनिरुद्ध शिंदे,सुरेश नांदे यांनी दिली आहे.

मैदान आणि गटवारी

​ही स्पर्धा केज येथील पंचायत समितीच्या मैदानावर रंगणार आहे. स्पर्धेचे स्वरूप अत्यंत चुरशीचे असून, यामध्ये ‘शहरी’ आणि ‘ग्रामीण’ अशा दोन स्वतंत्र गटांत सामने खेळवले जातील. प्रवेश फी २९९९ रु राहील.दोन्ही गटांतील अव्वल ठरणाऱ्या संघांमध्ये २३ मे रोजी महाअंतिम सामना (Grand Finale) रंगणार आहे.

पारितोषिकांचा वर्षाव

स्पर्धेतील विजेत्या संघांवर बक्षिसांची लयलूट होणार आहे.
​प्रथम पारितोषिक: टीव्हीएस रायडर (TVS Raider) बाईक,
​द्वितीय पारितोषिक : ५१,००० रुपये रोख.
​वैयक्तिक बक्षिसे : मॅन ऑफ द सिरीज,बेस्ट बॅट्समन,बेस्ट बॉलर, बेस्ट ऑल राऊंडर आणि बेस्ट विकेटकीपर या श्रेणीतही विशेष गौरव केला जाणार आहे.
​स्पर्धेचे उद्घाटन: १३ मे २०२६ ​अंतिम सामना व बक्षीस वितरण: २३ मे २०२६

“युवा नेते अक्षयभैय्या मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त केजमधील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे,या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.जास्तीत जास्त संघानी या स्पर्धेत सहभागी होऊन,शहर आणि ग्रामीण भागातील खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करावे.- सुनील घोळवे (आयोजक)

सहभागाचे आवाहन

​या भव्य स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभाग नोंदवावा,असे आवाहन संयोजक प्रकाश मुंडे, किरण सारूक सर, हाफी साहेब इनामदार आणि प्रमोद मस्के यांनी केले आहे.या स्पर्धेमुळे केज परिसरातील क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून,सुनील घोळवे यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!