गुन्हेगारी

खरमाटा शिवारात महिलेचा विनयभंग,केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील एका गावातील महिलेला शेतात एकटीला पाहून तीला मिठी मारून,तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून तीचा विनयभंग केल्या प्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादी वरून सुग्रीव मुंडे रा. मुंडेवाडी याच्या विरुद्ध केज पोलिसात गून्हा नोंद करण्यात आला आहे.

मंगळवारी दि.१०फेब्रुवारी रोजी सायंकाळी खरमाटा शिवारात पिडीत महिला एकटी पाहून सुग्रीव मुंडे रा.मुंडेवाडी याने तीला मिठी मारून,तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून तीला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन पिडीत महिलेचा विनयभंग केला.पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून सुग्रीव मुंडे रा.मुंडेवाडी याच्याविरुद्ध केज पोलिसात विनयभंग केल्याचा गून्हा नोंद झाला आहे.पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक उप निरीक्षक बालासाहेब सानप हे पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!