सामाजिक

होळ वीज उपकेंद्रात १० एम व्ही ए क्षमतेचे रोहित्र तात्काळ बसवा अन्यथा बेमुदत ठिय्या आंदोलन, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांचा महावितरणला इशारा 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील होळ ३३ के.व्ही.विद्युत उप केंद्रातुन होळ,लाडेगाव, दिपेवडगाव,लाडेवडगाव,मुलेगाव ता.केज येथील शेतकऱ्यांना शेती साठी वीज पुरवठा दिला जातो. मात्र सद्यस्थितीत होळ ३३के.व्ही.वीज उपकेंद्रा तुन क्षमतेपेक्षा अधिक वीजेची मागणी असुन वरिल गावातील जवळ पास सर्वच फिडर वरील रोहित्रातुन कमी दाबाने व अनियमितपणे शेतकऱ्यांना तब्बल ३० तास व काही फिडर वर ३६ तासानंतर फक्त ६ तास वीजपुरवठा दिला जात आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे भिजवणे होत नसून पिके वाळून जात आहेत.

या सर्वच गावातील शेतकऱ्यांना उच्च दाबाने दिवसा आठ तास वीज देण्याच्या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदिप करपे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या वतीने होळ ३३ के.व्ही.उपकेंद्र कनिष्ठ अभियंता कार्यालयासमोर दि.११ डिसेंबर २०२५ रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.तेंव्हा महावितरणअधिकाऱ्यांनी लेखी दिलेल्या लेखी आश्वासनुसार सदर आंदोलनस्थगित करण्यात आले होते.

या पत्रातील आश्वासनानुसार होळी विद्युत ३३के.व्ही वीज उपकेंद्रात १० एम व्ही ए क्षमतेचे रोहित्र बसवून वीजपुरवठा उच्च दाबाने सर्व कृषि ग्राहकांना पुरवठा करणे आवश्यक होते मात्र अद्यापही रोहित्र न बसवल्याने क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी शुक्रवार दि.२० फेब्रुवारी २०२६ पासुन बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा बीड येथील महावितरणच्या मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री.प्रेमसिंग राजपूत यांना निवेदनाद्वारे बुधवारी दि.११ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष भेटून दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!