शैक्षणिक

भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा

केज/प्रतिनिधी

केज येथील भाऊसाहेब पाटील अध्यापक महा विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा करण्यात आला.यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.हनुमंत सौदागर,प्रमुख पाहुणे, प्रा.श्रीकांत लुंगारे हे होते.पुढे बोलताना ते म्हणाले की केले की,१४ जानेवारी हा दिवस महाराष्ट्राच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासा तील सुवर्णक्षण आहे.

अनेक वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर विद्यापीठाला महामानवाचे नावमिळाले, हा विजय समतावादी विचारांचा होता.यासाठी अनेकांना आपल्या जीवाचे समर्पण करावे लागले. विद्यापीठाला ज्ञानसूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिल्याने तो विद्यापीठाचा बहुमान झाला असे म्हणता येईल. डॉ.बाबासाहेबांनाअपेक्षित असणाऱ्या शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान ग्रहण करून त्या ज्ञानाचा वापर मानव कल्याणासाठी झाला पाहिजे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून शिक्षण घेऊन जगभर नाव काढणारे विद्यार्थी घडले आहेत ग्रामीण भागासाठी हे विद्यापीठ ज्ञानगंगा ठरले आहे असे मत व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.बलाढये यु.बी,प्रा.कचरे जे.एस,प्रा. जगदाळे एम.एच,प्रा.चोले एन.जे,ग्रंथपाल संतोष साळवी,सुजीत नाईकवाडे,वामन चिगुरे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!