शैक्षणिक

शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत बाह्य मूल्यांकनात साने गुरुजी निवासी विद्यालयास (अ+) दर्जा प्राप्त.

केज/प्रतिनिधी

दि.१५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे राज्य शाळा मानांकन प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे.शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळां साठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याची निर्मिती करण्यात आलेली आहे.

शाळांचे स्वयं मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या maa.ac. in या वेबसाईट वरील SQAAF मुल्यांकना साठी scert-data.web.app ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती.सन २०२४-२५ मध्ये राज्या तील१,०२,६७५ शाळांनी स्वयंमूल्यांकन पूर्ण केले. सन २०२४-२५मध्ये स्वयं मूल्यांकनामध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या शाळां पैकी सन २०२५-२६ मध्ये १०७१२शाळांची बाह्य मूल्यांकन करण्यासाठी निवड करण्यात आली होती.

त्यापैकी १०६४४ शाळांचे मूल्यांकन पूर्ण करण्यात आले.यात़ बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केज संचलित,साने गुरुजी निवासी प्राथमिक विद्यालय केज,साने गुरुजी निवासीमाध्यमिक विद्यालय केज,व साने गुरुजी उच्च माध्यमिक विद्यालय केज या तीनही शाळांना स्वयं मूल्यांकन व त्रयस्थ व्यक्तींकडून केलेले बाह्य मूल्यांकन यात सर्वाधिक गुणप्राप्त होऊन (अ प्लस) श्रेणी प्राप्त झाली आहे.

राज्यातील ४० शाळांमध्ये या तीनही शाळा असून नुकतेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षणसंस्था अंबेजोगाईच्या वतीने शाळेस अभिनंदनाचे पत्र प्राप्त झाले आहे.दर्जा प्राप्त झाल्यानंतर शाळेच्या दर्शनी भागात व शाळेच्या लेटरहेडवर (अ प्लस )श्रेणी प्राप्त असा उल्लेख करण्याचे आदेश पत्रान्वये देण्यात आलेले आहे.तसेच पुढील वर्षी राज्यातील शाळांना सदर शाळेचे पुरावे महाराष्ट्र राज्याच्या www.maa.ac.in. वेबसाईटवरपाहण्यासाठी व मार्गदर्शनासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत.

केज तालुक्यातून बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केज संचलित,साने गुरुजी निवासी विद्यालय तीनही शाळां (अ+) श्रेणी आल्याबद्दल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबेजोगाई चे प्राचार्य डॉ.अनिल मुरकुटे सर,सहाय्यक आयुक्त कार्यालय बीडचे सहाय्यक आयुक्त श्री. क्षिरसागर साहेब, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबेजोगाईच्या वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. भागीरथी गिरी तालुक्याचे समन्वयक व वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.जयपाल कांबळे सर, डॉ.गोरे सर,डॉ.सुरवसे सर,डॉ.देशमुख सर,श्री. बारगजे सर, गटशिक्षणाधिकारी कार्यालय केजचे गटशिक्षण अधिकारी श्री. सुनील केंद्रे ,ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी दत्ता आबा चाटे,केज केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.संजय चौरे यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.सदर शाळेचे संस्थापक अध्यक्ष अॕड.उद्धवराव कराड साहेब व संस्था उपाध्यक्ष राजेश कापसे यांनी प्राचार्य तथा मुख्याध्यापक व सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्थेच्या वतीने कौतुक केले आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!