कृषीसामाजिक

बीड जिल्ह्यात लंपी आजाराने जनावराचा मृत्यू शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी प्रा.बबनराव आंधळे

बीड/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये साधारणता 800 ते 900 जनावरांना लंपी त्वचारोग बाधा झालेली आहे यात 50 ते 60 जनावरांचा मृत्यू देखील झाला असून जे शेतकरी पशुपालक आहेत ते चिंतेत आहेत या गंभीर परिस्थितीमध्ये यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना तातडीने करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी केली आहे सद्यस्थितीत बीड जिल्ह्यात लंपी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे जिल्ह्यात शेकडो जनावरांना बाधा झाली आहे.

आतापर्यंत 800 ते 900 जनावरे बाधित झाले असून पन्नास-साठ जनावरांचा मृत्यू झालेला आहे.दरम्यान 500 ते 600 जनावरे उपचारा नंतर बरी झालेली आहेत दरम्यान 3,41,135 जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले असून या आजारामुळे शेतकरी वर्गावर मोठा आर्थिक परिणाम झाला असून दूध उत्पादनात घट झाली आहे.

अनेक ठिकाणी दुधाचे सेवन टाळण्याच्या सूचना देण्यात आल्याने दुग्ध व्यवसायिकानाही फटका बसत आहे या पार्श्वभूमीवर लंपी आजाराने बाधित भागात पशुवैद्यकीय पथके वाढवून उपचार तातडीने सुरू ठेवावेत लसीकरण मोहिमेला गती देऊन शंभर टक्के जनावराचे लसीकरण पूर्ण करावे. लंपी बाधित व मृत जनावरांच्या मालकांना म्हणजे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करावी.

जिल्ह्यातील पशुधन बाजार दुग्ध संघ व डेअरी केंद्रासाठी तात्पुरती मार्गदर्शक तत्वे लागू करावीत तसेच जिल्हा प्रशासनास आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा आपल्या हस्तक्षेपामुळे या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात निश्चित मदत होईल असा विश्वास ही प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी व्यक्त केला आहे.बीड जिल्ह्यात मागील काही दिवसा पासून लंपी या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे जनावराचे मृत्यू देखील झालेले आहेत शिवाय पशुपालकाचा मोठा खर्चही होत आहे.

अशावेळी बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी या विषयाकडे लक्ष देणे आवश्यक आहे परंतु तसे होताना दिसत नाही.अशा वेळी केवळ प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी या विषयात लक्ष घालून बीड जिल्ह्यात आपले चौफेर लक्ष असल्याचे दाखवून दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!