राजकीय

नसरीन बागवान यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार गट बीड जिल्हाध्यक्षा पदी नियुक्ती

केज /प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या बीड जिल्हाध्यक्षा पदावर नसरीन बागवान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्तीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा. शरदचंद्रजी पवार,महिला राष्ट्रीय अध्यक्षा फौजीया खान,तसेच खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आ.जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.या नियुक्तीद्वारे पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाला गती मिळणार असून,बागवान यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा. शरदचंद्रजी पवार,राष्ट्रीय कार्याध्यक्षा व संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे, महिला राष्ट्रीय अध्यक्षा फौजीया खान,आ. जयंतराव पाटील तसेच प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली पक्षाला नवचैतन्य मिळावे या हेतूने त्यांनी काम करण्याची तयारी दर्शवली आहे.पक्षाचीध्येय धोरणे सर्वसामान्यां पर्यंत पोहोचविण्यासाठी व पक्ष बळकटीसाठी आपले पूर्ण सहकार्य राहील,असा विश्वास नव्याने नियुक्त झालेल्या जिल्हाध्यक्षा नसरीन बागवान यांनी व्यक्त केला.त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!