केज शहरात मटका जुगार चालवुन अनेकाचे संसार उद्धवस्त करणाऱ्या मटका चालकास काल बेड्या ठोकून हर्सूल जेलमध्ये केली रवानगी, पोलिस अधीक्षक नवनीत काॕवत यांची धडाकेबाज कारवाई

केज/प्रतिनिधी
केज शहरात मटका जुगार चालवुन अनेकाचे संसार उद्धवस्त करणाऱ्यामटका चालकास बेड्या ठोकून हर्सूल जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक नवनीत काॕवत यांनी धडाकेबाज कारवाई करत अनेक वर्षापासुन गणेश सुधीर खराडे वय ३५वर्ष रा.केज हा केज तालुक्यात कल्याण मुंबई नावाचा मटका घेत होता अनेक वर्षात त्याच्यावर केज पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल होते.मारा मारी करणे,धमकावणे असे दहा गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.याचीदखल घेऊन केज उपविभागीय पोलीस अधिक्षक यांनी गणेश खराडे याच्या विरोधात अहवाल तयार करून तो जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला होता.
परवा रात्री जिल्हा पोलिस अधीक्षक बीड यांच्या आदेशावरून केज पोलिसांनी गणेश च्या मुसक्या आवळून त्यास बीड पोलिसांच्या एल सी बी पथकाच्या ताब्यात दिले. गणेश खराडे यास हर्सूल जेल मध्ये पाठवण्यात आले आहे. गणेश खराडे यास जेल मध्ये पाठवल्यामुळे केज तालुक्यातील गुन्हेगारीला आळा बसेल,अनेक दिवसापासुन खराडे यास अटक करण्याची नागरिकांची मागणी होती ती आज पूर्ण झाली आहे. पोलिसांच्या या कारवाई मुळे केज परिसरात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

