जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेत तिळगुळ कार्यक्रम संपन्न.

केज/प्रतिनिधी
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता.केज या शाळेत तिळगुळ कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक श्री. राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी केले.दि.१४ जानेवारी रोजी सुर्य धनु राशीतुन मकर राशीत प्रवेश करतो.तिळामुळे शरीरात तैलग्रंथी निर्माण होऊन थंडीपासून बचाव करण्यासाठी उपयोग होतो.तिळामध्ये सेसमिन आणि सेसमोलिन हे दोन सर्वात महत्त्वाची संयुगे असतात.जी कर्करोगाच्या पेशी वाढण्यास प्रतिबंध करतात.हृदयविकाराचा धोका कमी होतो.
तिळगुळ खाल्ल्याने शरीरात लोह वाढते.शरीरात जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात अशी माहिती आपल्या प्रास्ताविकात श्री. राजाभाऊ दत्तात्रय कदम अपग्रेड मुख्याध्यापक यांनी सांगितली.या शाळे तील प्राथमिक पदवीधर शिक्षक डॉ.रामकिशन ग्यानबा मुळे सर,श्री. संदीप मेघराज ठोंबरे सर, श्री.राहुल बजरंग बचुटे सर,श्री.आकाश दत्तात्रय लोंढे सर,श्री.आबासाहेब तुळशिराम धपाटे सर, श्रीमती अंजली गोविंदराव उटीकर मॅडम,श्रीमती निलावती अनिलकुमार भोरे मॅडम,ट्रेनी शिक्षिका रोहिणी श्रीधर काळे मॅडम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
तिळगुळ शिक्षक,विद्यार्थी व विद्यार्थिनींना उपस्थित गावकरी, महिला,पीएम पोषण शक्ती निर्माण योजना कामगार स्वर्णमाला पवार व अनिता पवार या सर्वांना वाटप करण्यात आले.या दिवशी शाळेत व परिसरात स्वच्छतेचा उपक्रम राबविण्यात आला.शाळेत व परिसरात स्वच्छता करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.आकाश दत्तात्रय लोंढे सर यांनी केले.श्री.राहुल बजरंग बचुटे सर यांनी आभार मानले.



