राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उपाध्यक्षा माजी आमदार सौ. संगीताताई ठोंबरे यांनी हाती घेतला धनुष्यबाण, उप मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे नेतृत्व स्विकारत केला शिवसेनेत प्रवेश 

केज/प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट यांच्या उपस्थितीमध्ये केज विधानसभा मतदार संघाच्या माजी आमदार सौ.संगीताताई ठोंबरे, डॉ.विजयप्रकाश ठोंबरे व्हा.चेअरमन लोकनेते गोपीनाथराव मुंडे सहकारी सूतगिरणी केज यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन भैय्या मुळूक,जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप, चंद्रकांत आप्पा नवले, तालुकाप्रमुख परळी व्यंकटेश शिंदे उपस्थित होते.यावेळी त्यांच्या सोबत विजय बापू केंद्रे संस्थापक अध्यक्ष संत भगवान बाबा युवा सेना, किशोरजी थोरात माजी सरपंच कुंबेफळ,अरविंद चाळक,अशोक सक्राते माजी सरपंच येवता, उमेश चाळक यांचाही शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला.या प्रवेशामुळे केज विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली असून अजुन मोठे प्रवेश होणार असल्याचे कार्यकर्त्यांतुन बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!