सामाजिक

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चिंचोली माळी येथे मकर संक्रांती निमित्त माता पालक मेळावा संपन्न. 

केज/प्रतिनिधी

दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चिंचोली माळी येथे मकर संक्रांती निमित्त माता मेळावा आयोजित केला होता.यात हळदी कुंकू व तिळगुळ कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी गावच्या सरपंच सौ. देशमुख ताई या कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी विराजमान होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मुख्याध्यापक श्री. गलांडे सर यांच्या पत्नी सौ.गलांडे ताई,काटे ताई , पठाण ताई या उपस्थित होत्या.याप्रसंगी शाळेतील मुलांच्या माता बहुसंख्येने उपस्थित होत्या.या प्रसंगी जिजामाता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय गलांडे सर शाळे तील ज्येष्ठ शिक्षिका सौ. पिसे मॅडम,विशेष शिक्षिका बाराते मॅडम, श्रीमती मंजुषा वानखेडे मॅडम,मनीषा सोनवणे मॅडम,श्री.अमोल राऊत सर,बाळू नायकोडे सर, श्री.श्रीराम घुले सर,उर्दू शाळेतील मुजमील शेख सर,उर्दू शिक्षिका सम्रीन शेख मॅडम,अंगणवाडी ताई आदी उपस्थित होते. अध्यक्षीय समारोप करताना सरपंच सौ. देशमुख ताई यांनी यावेळी बोलताना सांगितले की, आपल्या शाळेतील भौतिक सुविधा तसेच इतर अडचणी प्राधान्याने सोडविणार आहे.काही अजुन समस्या असतील तर कळवाव्यात असे आवाहन करून मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. आभार प्रदर्शनाने कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!