लक्ष सायन्स क्लासेसच्या विद्यार्थ्यांना यशाकडे झेप घेण्यासाठी दिला निरोप समारंभ

केज/प्रतिनिधी
लक्ष सायन्स क्लासेस आणि करिअर अकॅडमी च्यामाध्यमातून प्राध्यापक गालफाडे सर व त्यांच्या टीमने आजपर्यंत केज शहरातील व केज तालुक्यातील असंख्य विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनीयर,वकील,डी फार्मसी,नर्सिंग,कृषी आणि विविध क्षेत्रांमध्ये या क्लासेसचे विद्यार्थी सेवा देत आहेत.या क्लासेसला २४ वर्षे पूर्ण होत आहेत २००२ साली सुरू झालेले लक्ष सायन्स क्लासेस व करिअर अकॅडमी नावाचे एक रोपटे आज वटवृक्षाचे स्वरूप धारण करत आहे.
म्हणजेच लक्ष सायन्स क्लासेस व करिअर अकॅडमी २००२ साली छोट्याशा स्वरूपात केज शहरात सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी प्रायव्हेट कोचिंग देण्याचं काम करत होती,आज या अकॅडमीने असंख्य विद्यार्थ्यांना उच्चपदावर आणि नामांकित पदावर बसवण्याचं काम केलेल आहे.प्राध्यापक गालफाडे सरांच्या माध्यमातून ते काम यशस्वीपणे आज २४ वर्षांपासून चालत आहे.
यावर्षी देखील सन २०२५-२६ बारावी सायन्स बॅचचे विद्यार्थी ज्ञानाची शिदोरी घेऊन यशाची झेप घेण्यासाठी निघाले आहेत आणि याच निमित्ताने प्रतीवर्षी प्रमाणे या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून सर्व विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला आणि पुढील आयुष्यात विविध पदावर आपण यश संपादन करावे असे मत प्राध्यापक गालफाडे सर यांनी व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.गोपिचंद सपाटे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.नितेश गुंड सर, प्रा.सौ.प्रियंका शिंदे होते. या कार्यक्रमाचे आभार जान्हवी कापरे या विद्यार्थिनीने सर्व प्रमुख पाहुण्यांचे आभार व्यक्त केले.


