
केज/प्रतिनिधी
लातुर जिल्ह्यातील औसा येथील जवाहर नवोदय विद्यालयात सहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या दलित मातंग समाजातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूची गंभीर घटना उघडकीस आली आहे.या घटनेची सखोल चौकशी करून दोषी विरुद्ध अॕट्रॉसिटीचा व खुनाचा गून्हा नोंद करण्यात यावा. या मागणीसाठी केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातसोमवारी सकाळी ११ वाजता केज तालुक्यातील सकल दलित (मातंग) समाज कृती समितीच्या वतीने दिड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीची आत्महत्या नसून तीचा खुनच असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला असून या प्रकरणी सखोल चौकशी करून विद्यालया तील दोषी अधिकारी व कर्मचान्यांवर तात्काळ खुनाचा व अॕट्रॉसिटीचा गून्हा दाखल करून कठोर कारवाई करावी व सीबीआय मार्फत चौकशी करावी,अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या रास्तारोको आंदोलनात सकल दलीत-मातंग समाजाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यां मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.यावेळी केज पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.



