सांस्कृतीक

माळेगाव यात्रेत केजच्या राजाचा बोलबाला, आण्णासाहेब पाटलांच्या घोड्याने यात्रेकरूंचे लक्ष वेधले 

केज/प्रतिनिधी

नांदेड जिल्ह्यातील माळेगाव या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या यात्रेतील प्रदर्शनात केज शहरातील शिवसेना एकनाथराव शिंदे पक्षाचे केज तालुकाप्रमुख आण्णासाहेब सुरेश तात्या पाटील यांचा राजा नावाच्या घोड्याने सर्वांचे लक्ष वेधले. अवघ्या सव्वा दोन वर्षाचे वय असलेला चपळ, गुणी, उमदा घोडा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.यावेळी अनेकांना राजासोबत फोटो काढायचा मोह आवरता आला नाही.

परंपरेने गेल्या तीस वर्षा पासून केज येथील पाटलांची राहोटी माळेगाव येथील यात्रेत असते.प्रदर्शना दरम्यान केजचे मनोज दांगट पाटील,आकाश पाटील, दत्ता काकडे,बाळासाहेब कवठेकर,जवळबन चे सरपंच प्रमोद करपे, अमोल वळसे, सुनील देशमुख,रवी साखरे यांच्यासह गावकऱ्यांनी भेट देऊन कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!