सौ.सरोजनी दादासाहेब ससाणे यांच्या चिंचोली माळी जिल्हा परिषद गटा तून उमेदवारीमुळे मोठ्या मोठ्या नेत्यांनी घेतला धसका,कामाचा उमेदवार निवडून येणार जनतेतून चर्चा

केज/प्रतिनिधी
चिंचोली माळी जिल्हा परिषद गटातून सौ. सरोजनी दादासाहेब ससाणे यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्या पासून संपूर्ण तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या स्पष्ट,ठाम आणि विकासाभिमुख भूमिके मुळे प्रस्थापित व मोठ्या नेत्यांमध्येही अस्वस्थता दिसून येत असून,यावेळी कामाचा उमेदवार निवडून येणार अशी चर्चा थेट जनतेतून सुरू झाली आहे.
सामाजिक बांधिलकी,सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांबाबतची संवेदनशीलता आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा ही सौ.ससाणे यांची ओळख आहे.पाणीटंचाई,रस्त्यांची दुरवस्था,आरोग्य सुविधा, शैक्षणिक प्रश्न,महिलां साठीच्या शासकीय हेयोजना,तसेच शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या अडचणी यांसाठी त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे.कोणताही गाजावाजा न करता प्रत्यक्ष कामातून प्रश्न सोडवण्यावर त्यांचा भर असल्याने काम बोलतंय, शब्द नाही अशी प्रतिमा जनमानसात निर्माण झाली आहे.
उमेदवारी जाहीर होताच चिंचोली माळी व परिसरातील गावांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.विविध सामाजिक संघटना, महिला बचत गट,युवक वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिकां कडून त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.प्रत्यक्ष भेटीगाठी, प्रचार दौरे आणि संवादातून मतदार सौ. ससाणे यांच्याकडे निष्कलंक,अभ्यासू आणि काम करणारा चेहरा म्हणून पाहत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
महिला सक्षमीकरण, युवकांना रोजगाराच्या संधी, गावपातळी वरील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणे आणि पारदर्शक कारभार ही त्यांच्या प्रचाराची प्रमुख सूत्रे ठरत आहेत.सत्ता नव्हे,सेवा हेच ध्येय या भूमिकेने त्या मतदारांशी संवाद साधत असून,विकासाच्या ठोस आराखड्यासह त्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
राजकीय जाणकारांच्या मते,चिंचोली माळी गटात सौ.सरोजनी ससाणे यांची वाढती लोकप्रियता इतर उमेदवारांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. बदलाची अपेक्षा असलेला मतदारवर्ग आणि प्रत्यक्ष काम पाहून निर्णय घेणारी जनता यामुळे या गटातील निवडणूक लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.एकूणच चिंचोली माळी जिल्हा परिषद गटात यावेळी कामाचा उमेदवार निवडून येणार ही चर्चा दिवसेंदिवस जोर धरत असून,सौ.सरोजनी दादासाहेब ससाणे यांच्या उमेदवारीमुळे येथील राजकीय समीकरणे बदलण्याची स्पष्ट शक्यता निर्माण झाली आहे.



