अंबाजोगाई नगराध्यक्ष पदावर नंदकिशोर मुंदडा यांची निवड; केज तालुका भाजपातर्फे जंगी स्वागत!

केज/प्रतिनिधी
अंबाजोगाई नगर परिषद च्या नवनिर्वाचित नगराध्यक्षपदी ज्येष्ठ नेते नंदकिशोर (काकाजी) मुंदडा यांची निवड झाल्या बद्दल केज तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचे उत्साहात अभिनंदन करण्यात आले.आमदार नमिताताई मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला.
विकासाच्या ‘मुंदडा पॅटर्न’वर शिक्कामोर्तब
नंदकिशोर मुंदडा यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि दूरदृष्टीचा फायदा अंबाजोगाई शहराच्या विकासाला होईल,असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.आमदार नमिताताई मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंदडा परिवाराने जनसेवेचा जो वारसा जपला आहे त्याला या विजयाने अधिक बळ मिळाले आहे.यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी केज तालुक्यातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काकाजींचे अभिनंदनकेले.डॉ.वासुदेव नेहरकर (जिल्हाध्यक्ष, वैद्यकीय आघाडी), भगवान केदार (भाजपा केज तालुका अध्यक्ष),सुरज भैया घुले (युवानेते), महादेव सूर्यवंशी (अध्यक्ष, व्यापारी महासंघ),प्रकाश मुंडे (ज्येष्ठ पत्रकार), अरुण चाटे,सदाशिव चाटे,शिवाजी चाटे, शिवाजी पाटील,चंदुलाल मिसाळ यासोबतच महादेव जाधवर,बाबा चौरे मामा,विक्रम डोईफोडे, किसन कदम,विकास जाधव, गोरख मोराळे यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
काकाजी यांच्या निवडीमुळे अंबाजोगाईच्या विकासाला नवी गती मिळेल.हा विजय सर्व सामान्य कार्यकर्त्यांचा आणि जनतेच्या विश्वासाचा विजय आहे अशी भावना यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.घोषणा देत विजयाचा गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.



