केज येथे राष्ट्रसंत भगवान बाबा पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

केज / प्रतिनिधी
राष्ट्रसंत ह.भ.प.भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त केज शहरात भव्य अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.हा सप्ताह भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा होत असून रामकथा सह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी हरिनाम जप,कीर्तन, प्रवचन व भजन सेवेने सप्ताहाची सुरुवात झाली.सप्ताहकाळात राज्यातील नामवंत कीर्तनकार व प्रवचनकार सहभागी होत असून दररोज सकाळी व सायंकाळी धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत.
रवीवारी रात्री ८ते १० यावेळेत ह.भ.प. शिवकन्या ताई चौरे आळंदी देवाची यांचे किर्तन संपन्न झाले असून सोमवारी ह.भ.प.पांडुरंग महाराज मुंडे शेषाबाई मठ संस्थान तांबवा,मंगळवार रोजी ह.भ.प.नंदिता ताई मैंद आई साहेब मठ संस्थान महासांगवी पाटोदा,बुधवारी ह.भ.प. जालिंदर महाराज नेहरकर केज, गुरुवारी ह.भ.प. विष्णु महाराज थोरात कुंबेफळ,शुक्रवारी ह.भ.प.दिपक महाराज मेटे लहुरी,शनिवारी ह.भ.प.ज्ञानदेव बापु महाराज केज,तसेच रविवारी सकाळी ठीक १० ते १२ या वेळेत साधु शिवराम पुरी मठ संस्थान वरपगाव मठाधिपती महंत ह.भ.प.भगवान महाराज शास्त्री यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
अखंड हरिनाम सप्ताहाच्या दरम्यान ग्रामस्थ व भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असून परिसर भक्ती रसात न्हाऊन निघाला आहे.सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.समस्त ग्रामस्थ व परिसरातील भाविकांनी या भक्तीमय सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक ह.भ.प.ज्ञानदेव बापुनेहरकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.



