भारतीय शास्त्रज्ञांचे उल्लेखनीय यश,एल व्ही एम ३-६ सॕटेलाईट मुळे सर्वत्र कनेक्टिव्हिटी मिळणार

बीड/प्रतिनिधी
लवकरच आपल्या देशातील राज्यातील गावातील मोबाईल टॉवर दिसायचे बंद झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका कारण इस्रो या भारतीय शास्त्रज्ञांच्या संस्थेने आत्ता पर्यंत ३४ इतर देशांसाठी सुमारे ४३४ सॅटॅलाइट उपग्रहांमध्ये सोडले आहेत आणि या सर्वाचा एक भारतीय म्हणून आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.त्यामध्ये दोनच दिवसांपूर्वी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आणखी एक मोठे अभूतपूर्व यश मिळवले आहे.
त्यामध्ये त्यांनी एल व्ही एम ३-६ हा सॅटॅलाइट लॉन्च केला आणि या सॅटेलाईट लॉन्च मुळे आता येणाऱ्या काळात आपल्याला सॅटॅलाइट द्वारे नेटवर्क कनेक्टिव्हिटी साठी फार मोठी मदत होणार आहे येणाऱ्याकाळात आपल्या देशात, गावात,जिल्ह्यात असणारे मोबाईल टॉवर आपल्याला दिसले नाहीत तर आश्चर्य वाटून घेऊ नका कारण इसरो ने आत्ता सोडलेल्या या सॅटॅलाइट मुळे ही क्रांती शक्य झाले आहे.
भारत आणि अमेरिकेच्या या संयुक्त मोहिमेत आता भारताचा एल व्ही एम थ्री हा अमेरिकेच्या ब्ल्यू बोर्ड ब्लॉक टू ची कनेक्ट होईल आणि मोबाईल व टेक्नॉलॉजीच्या अनेक क्षेत्रात पुढील काळात हे क्रांतिकारक पाऊल ठरेल घनदाट जंगल असो समुद्र असो अथवा वाळवंटअसो तेथे तुम्हाला सॅटॅलाइटद्वारे
नेटवर्क मिळू शकेल. कारण दोन दिवसांपूर्वी भारताने या सोडलेल्या सॅटॅलाइटची क्षमता खूप मोठी आहे सुमारे साडे सहा हजार किलो वजनाचा हा सॅटॅलाइट आहे आणि भारतीय शास्त्रज्ञांनी ५२ दिवसाच्या कालावधीत केलेली ही दुसरी मोठी यशस्वी क्रांती आहे.
कारण ५२ दिवसा पूर्वीच आपण पहिले एक सॅटॅलाइट सोडले होते. त्यामुळे इसरो आणि भारत हे इतर देशांसाठी आता सॅटॅलाइट सोडणारे एक सबस्टेशन झालेले आहे.५२०० किलोमीटर च्या अंतर पार करून हे सॅटॅलाइट अमेरिकेच्या ब्ल्यू बोर्ड ब्लॉक टू सी कनेक्ट होईल आणि लवकरच याचा उपयोग फक्त मोबाईल नेटवर्क साठी नाही तर संरक्षण क्षेत्रात जिथे आपल्या पाणबुडी आणि सीमा रेषेवर नेटवर्क कमी पडते त्यासाठी सुद्धा उपयुक्त होईल अंतराळ यान क्षेत्रात आपली ताकद व टेक्नॉलॉजी दाखवून एका वेगळा उंचीवर नेणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार तर त्यासाठी अर्थ पुरवठा करणाऱ्या भारतीय सरकारचे सुद्धा मनःपूर्वक अभिनंदन ये नया भारत है रुकेगा नही जय हिंद धन्यवाद असे अजय पाटील विटा रेणावी यांनी सांगितले आहे.



