
केज/प्रतिनिधी
बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केज संचलित,साने गुरुजी निवासी विद्यालयाची विद्यार्थिनी कु.प्रांजली चंद्रसेन चौरे हिची १९ वर्ष मुलींच्या महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली आहे.दि.२६ डिसेंबर २०२५ ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्यस्तरीय १९ वर्ष वयोगट मुलींच्या शालेय बेसबॉल स्पर्धा सफाळे ता.जि. पालघर, येथे संपन्न झाल्या.या स्पर्धेत साने गुरुजी निवासी विद्यालयाचा १९ वर्ष मुलींचा संघ सहभागी झाला होता.या संघातील कु.प्रांजली चंद्रसेन चौरे हिची महाराष्ट्र राज्य बेसबॉल संघात निवड झाली आहे.
पुढील राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत आहे.या विद्यार्थिनीची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाल्याबद्दल त्याचे बीड जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.अरविंद विद्यागर,बेसबॉल चे जिल्हा क्रीडा मार्गदर्शक रेवन्नाथ शेलार सर,तालुका क्रीडा अधिकारी अनिकेत काळे सर,केज तालुका क्रीडा अधिकारी राखी यादव मॅडम,संघटनेचे अध्यक्ष श्री.दिनकर थोरात सर, बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ संस्थेचे अध्यक्ष ॲड. उद्धवराव कराड सर, श्री.कापसेसर मार्गदर्शिका डॉ.कविता गित्ते मॅडम या सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री.रामदास सानप सर,श्री.तरकसे सर,कृष्णा गित्ते,केशव कराड,श्री.साखरे सर,श्री. घुले सर,श्रीमती कांदे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले होते.सदर विद्यार्थिनी राष्ट्रीय स्पर्धे साठी शुभेच्छा देण्यात आले आहेत.



