भुमी अभिलेख कार्यालया तील कर्मचाऱ्यांला दहा हजार रुपयाची लाच घेताना लिपिकाला रंगेहात पकडले

केज/प्रतिनिधी
केज येथील भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक माणिक अण्णासाहेब वाघमारे याला बोरगाव येथील एका शेतकऱ्याकडून १० हजार रुपयाची लाच स्वीकारताना सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान जालना येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्याअधिकाऱ्यांनी केज येथील तहसील कार्यालयाच्या समोर असलेल्या चहाच्या हॉटेलात जेरबंद केले आहे.केज तालुक्यातील बोरगाव येथील एका शेतकऱ्याच्या जमिनीचे क्षेत्र मोजणीनंतर कमी न करता जमीन मोजणीची फाईल निकाली काढण्या साठी केज येथील भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणीदार लिपिक माणिक अण्णासाहेब वाघमारे याने शेतकऱ्या कडे ३० हजाराच्या लाचेची मागणी केली होती.
त्यापैकी ५ हजार रुपये यापूर्वीच दिले होते. व उर्वरित २५ हजार रुपये स्वीकारण्याचे त्याने पंचा समक्ष मान्य केले होते. त्यापैकी सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान केज येथील तहसील कार्यालयाच्या समोरील एका चहाच्या हॉटेलात २५ हजारा पैकी १० हजार रुपयाची लाच स्वीकारताना त्याला जालना येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक बाळू संपत्ती जाधवर,पोलीस निरीक्षक शरदचंद्र सुरेशराव रोडगे, जमादार गजानन घायवट, पोलीस नाईक गजानन खरात, गजानन कांबळे, चालक व पोलीस नाईक विठ्ठल कापसे यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
सरकार पक्षातर्फे पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या फिर्यादीवरून १० हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलेल्या माणिक अण्णासाहेब वाघमारे मोजणी लिपिक, भूमी अभिलेख कार्यालयकेज याच्याविरुद्ध केज पोलिसात गून्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई जालना लाचलूचपत विभागाच्या पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे,अपर पोलीस अधीक्षक शशीकांत शिनगारे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उप अधीक्षक बाळू जाधवर, पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे व त्यांच्या पथकाने केली.या प्रकरणाचा तपास बीड येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक समाधान कवडे हे करीत आहेत.


