न्यायालयात विरोधात साक्ष का दिली? म्हणुन कोयता,कुऱ्हाडीने केला हल्ला,११जणांविरुद्ध गून्हा दाखल

केज/प्रतिनिधी :
केज न्यायालयात चालु आसलेल्या प्रकरणात आमच्या विरोधात साक्ष का दिली? या कारणा वरून ११ जणांनी एकाच कुटुंबातील ७ जणांवर कोयता,कुऱ्हाडीचा तुंबा व काठीने हल्ला केल्या प्रकरणी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून तब्बल ९ महिन्या नंतर जयश्री काकडे याच्या फिर्यादी वरून अकरा जणांविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी की,दि.१८ मार्च २०२५ रोजी रामभाऊ काकडे आणि त्यांचे कुटुंबीय शेतात काम करीत असताना,केज न्यायालयात न्यायप्रविष्ठ असलेल्या प्रकरणी आमच्या विरुद्ध साक्ष का दिली ? या कारणावरून भावकीतीलच ११जणांनी कोयता,कुऱ्हाडीचा तुंबा व काठीने सात जणाला मारहाण केली होती.
या प्रकरणी जयश्री काकडे यांनी केज येथील पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार दिली होती.परंतु या प्रकरणी गून्हा नोंद झाला नव्हता.त्यामुळे जयश्री काकडे यांच्या वतीने त्यांच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक नवनीत काॕवत यांची भेट घेवून आरोपीविरुद्ध गून्हा नोंद करण्याची मागणी केली होती.त्यावर पोलिसांनी सखोल तपास करून गून्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होते.
केज पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून शुक्रवार दि.२६ डिसेंबर २०२५ रोजी जयश्री काकडे यांच्या फिर्यादीवरून संगनमत करून व मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी राजाभाऊ मारूती काकडे, बालासाहेब मारूती काकडे,बाबासाहेब मारूती काकडे,गोकुळ बालासाहेब काकडे, हरीओम राजाभाऊ काकडे,लक्ष्मी बालासाहेब काकडे,अनुराधा बाबासाहेब काकडे,विद्या राजाभाऊ काकडे, सुदामती मारूती काकडे, रुक्मिण हनुमंत साखरे आणि पुजा राजाभाऊ काकडे या ११जणांविरुद्ध केज पोलिसात गून्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उप निरीक्षक उमेश निकम हे पुढील तपास करीत आहेत.दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.


