केज शहरातील शिक्षक कॉलनीतील समस्या प्राधान्याने सोडवणार – हारुणभाई इनामदार केज शहरातील शिक्षक कॉलनी भागात लोकनेते मुंडे साहेबांच्या चौकाचे नामकरण; मान्यवरांचा नागरी सत्कार संपन्न!

केज/प्रतिनिधी
केज शहरातील शिक्षक कॉलनी भागातील प्रलंबित प्रश्न,रस्ते,नाल्या आणि विजेच्या समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील,अशी ग्वाही नगर पंचायतचे गटनेते हारुणभाई इनामदार यांनी दिली.तसेच,या भागात १ कोटी रुपये निधीतून भव्य उद्यानाचे काम एका महिन्यात सुरू होणार असल्याचीघोषणा ही त्यांनी यावेळी केली.
शिक्षक कॉलनी भागातील आंबेजोगाई-बीड हायवेवर लोकनेते स्व.गोपीनाथराव जी मुंडे साहेब चौक’ स्थापन करण्यात आला आहे.पत्रकार प्रकाश मुंडे व या भागातील युवक यांच्या पुढाकारातून आणि नगर पंचायतच्या सर्वानुमते ठरावाद्वारे या चौकास मंजुरी मिळाल्याबद्दल,शिक्षक कॉलनीतील नागरिकांच्या वतीने कृतज्ञता सोहळा व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
विकासासाठी आम्ही कटिबद्ध मान्यवरांचे प्रतिपादन
या वेळी सत्काराला उत्तर देताना हारुणभाई इनामदार यांनी शिक्षक कॉलनीतील रस्ते,नाली, लाईट डीपी व इतर नागरी सुविधांच्या पूर्ततेचे आश्वासन दिले. नगराध्यक्षा डॉ.सौ. सिताताई बनसोड यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, शिक्षक कॉलनी भागातील समस्या सोडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन. तर नगरसेवक अझहर भाई इनामदार यांनीही या भागाच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबासाहेब केदार सर यांनी केले,तर आभार प्रदर्शन प्राध्यापक मुकुंद मुळे सर यांनी केले. या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार प्रकाश मुंडे, खय्युम शेख,अमोल धस, अमोल घुले,रवी घुले, अमोल मुंडे,पप्पू गायकवाड,रणजित घुले आणि प्रविण साबळे यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमास एम.डी.घुले सर,चंदू चौरे, सोनू धस, महादेव जाधवर, नागरगोजे साहेब,तांबडे सर,रोहित मुंडे,राजेश गवळी सर,बाबा मुंडे सर, गायकवाड ताई यांच्यासह शिक्षक कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



