कृषीप्रशासकीयसामाजिक

जीवाचीवाडी,तुकोची वाडी,राणूबाईची वाडी तील वीजपुरवठा खंडित ; शेतकरी संतप्त.

केज/प्रतिनिधी

जीवाचीवाडी,तुकोची वाडी व राणूबाईची वाडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.आठ तासांच्या वीज पुरवठ्यात केवळ पाच मिनिटेच लाईट मिळत असल्याने शेती पिके धोक्यात आली आहेत.

संबंधित लाईनमन व उप केंद्राशी वारंवार संपर्क साधूनही समाधानकारक प्रतिसाद मिळतनसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.लाईनमन फोनवर उडवाउडवीची उत्तरे देत असून दुरुस्तीबाबत गांभीर्य दाखवले जात नसल्याचा आरोप आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी देता येत नसल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.

या गंभीर प्रकाराबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून तातडीने जीवाचीवाडी परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करावा,अशी मागणी सर्व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. योग्य निर्णय न घेतल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा ही ग्रामस्थांनी दिला आहे. वीज विभागाने त्वरित दखल घेऊन समस्या सोडवावी,अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!