आम आदमी पार्टी पक्षात इनकमिंग सुरु,सांगवी येथे अनेक युवकांचा अॕड. दिनेश बिक्कड यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यात आम आदमी पक्षाला चांगले दिवस येत असुन आम आदमी पक्षाचे केज तालुकाध्यक्ष अॕड.दिनेश बिक्कड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सांगवी येथे अनेक युवकांनी आम आदमी पार्टी पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.१४ डिसेंबर २०२५ रोजी रविवारी सांगवी पाटी येथे केज तालुका आम आदमी पार्टीच्या वतीने प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.
केज तालुकाध्यक्ष अॅड. दिनेश बालाजी बिक्कड यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील युवकांनी आम आदमी पार्टीत जाहीर प्रवेश केला. यामध्ये देवगाव येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर तुकाराम नागरगोजे,पिंपळगाव चे बाळासाहेब गायकवाड, गोविंद भैया देशमुख, पांडुरंग जाधव,अभिजीत केदार,चेअरमन हनुमंत इंगळे,शशीकांत घोळवे, अनिल बिक्कड,बजरंग बाप्पा देशमुख व इतर युवकांचा समावेश आहे.
या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे केजतालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढवण्यासाठी आम आदमी पार्टीची टीम पूर्ण ताकदीने सज्ज झाली आहे.यासर्व नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन करत पुढील राजकीय सामाजिक वाटचाली साठी केज तालुकाध्यक्ष अॕड.दिनेश बिक्कड यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.



