
केज/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजितदादा पवार साहेब हे बीड जिल्ह्यात आले असता,केज येथून जात असताना राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते रमेशराव आडसकर यांनी केज येथे भेट घेऊन चालू घडामोडीं व विकासात्मक बाबींची थोडक्यात माहिती देऊन उपस्थित प्रमुख कार्यकर्ते यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
यावेळी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.रमेशराव आडसकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुशराजी इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप आबा गुळभिले,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अमर पाटील,युवक तालुकाध्यक्ष शिवदास थळकरी,रंजीत दादा आडसकर तसेच इतर मान्यवर व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
स्थानिक समस्या, विकासकामे व विविध योजनांबाबत थोडक्यात चर्चा करण्यात आली. केज तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यसरकार सकारात्मक असल्याचे अजितदादा पवार यांनी यावेळी सांगितले.



