
केज/प्रतिनिधी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवार दि.२१ नोव्हेंबर रोजी केज तालुक्यातील सारणी या गावी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या निवासस्थानी मुक्काम केला.निवडणुका दरम्यान बीड जिल्ह्यातील रणनीती याबाबत यावेळी गुजगोष्टी झाल्याचे समजते. काँग्रेसच्या सदभावना पद यात्रेने जिल्ह्यातील गढूळ वातावरण सकारात्मक तयार करण्यासाठी सद्भावना पदयात्रा महत्त्वाची ठरली होती.ही पदयात्रा यशस्वी करण्या साठी जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी मोठे परिश्रम घेतले होते. जिल्ह्यात होत असलेल्या नगरपालिका,नगरपरिषद निवडणुक प्रचार दौरा प्रदेशाध्यक्ष करत आहेत
खा.रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या मार्गदर्शना खाली काँग्रेस पक्षाची विचारधारा जिल्ह्यात पोहचवण्यासाठी राहुल सोनवणे पायात भिंगरी बांधून जिल्हाभर काम करत आहेत.सर्वत्र फिरत असताना ग्रामीण भागातील विविध प्रश्न ज्यात प्रामुख्याने लाईट, रस्ते,पाणी यांसह शेतकरी कामगार उपेक्षित वंचित यांचा आधार बनून काँग्रेस पक्ष काम करत आहे. सामाजिक सलोखा ठेवून काँग्रेसची सुरू असलेली वाटचाल यामुळे सामान्य माणूस काँग्रेसची जोडला जात आहे.
जिल्ह्यात राजकारणाची समीकरणे रणनीती यावर चर्चा झाल्या.यावेळी सारणी (आ) येथे जेष्ठ नेते माजी मंत्री अशोकराव पाटील, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आदित्य पाटील,जिल्हाध्यक्ष राहुल भैया सोनवणे,सारणी गावच्या सरपंच सौ. प्रणिता संतोष सोनवणे उपस्थित होते.यावेळी प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ यांचा सारणी ग्रामपंचायत यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. परिसरातून काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्ह्यात खूप दिवसांनी मतदारांना “पंजा” दिसतोय. स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वच ठिकाणी उमेदवार दिले असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत देखील काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याने ग्रामीण भागात देखील आता पंजा हे चिन्ह दिसणार आहे.त्यामुळे राहुल सोनवणे यांनी जिल्ह्यात काँग्रेस सक्रीय तर केलीच व अनेक वर्षापासून जिल्ह्यात न दिसणारे पक्षाचे चिन्ह दिसल्याने काँग्रेस प्रेमी जनता पक्षाच्या भूमिकेवर आनंदी असल्याचे दिसून येत आहे.



