निवडणूकराजकीय

शिवसेना उबाठा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ताकतीने लढवणार – बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव यांचा केज येथील बैठकीत निर्धार 

केज/प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसेना नेते माजी विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे, मराठवाडा समन्वयक उपनेते विश्वनाथ नेरूरकर उपनेत्या सुषमाताईअंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव यांच्या उपस्थितीत व माजी जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या अध्यक्षते खाली केज,अंबाजोगाई, परळी तालुका शिवसेना, युवा सेना,महिला आघाडी पदाधिकाऱ्याची बैठक बीड जिल्हा संपर्क कार्यालय केज येथे संपन्न झाली.

सदरील बैठकीत येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी संदर्भात गट निहाय,बुथनिहाय चर्चा करण्यात आली.येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या समवेत सर्व शिवसेना नेते, उपनेते,खासदार,आमदार स्टारप्रचारक ताकतीनिशी निवडणूक रिंगणात उतरणार आहेत करिता पूर्व नियोजनासाठी अंबाजोगाई,परळी,केज तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्कल निहाय बैठका घेऊन चार दिवसात अहवाल सादर करण्याचे संपर्क प्रमुख यांनी आवाहन केले.

यावेळी बैठकीला मा.जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे,उपजिल्हा प्रमुख दीपक मोराळे, नारायणजी सातपुते, सचिव रोहित कसबे, संघटक अशोक गाढवे, केज तालुका प्रमुख अशोक जाधव, अंबाजोगाई तालुका प्रमुख श्रीधर गरड,परळी तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल,शहर प्रमुख अशोक हेडे, राजेश विभुते तात्या रोडे,उपतालुका प्रमुख महेश केंद्रे, आप्पासाहेब कांबळे, सुभाष ठोबरे,सुरज वाघमारे,लक्ष्मण गलांडे, बापू गोरे,बाळासाहेब कसबे,उगलमुगले,पप्पू ढगे, आतम घाडगे माजी उपसभापती शशिकांत तारळकर,निलेश जाधव, बाळू फुलझलके सह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!