कोल्हेवाडी येथे लोकनेते स्व.गोपिनाथरावजी मुंडे यांच्या जयंती निमित्त शालेय साहित्य वाटप

केज/प्रतिनिधी
लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त येवता जिल्हा परिषद सर्कल मधील कोल्हेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व वस्ती शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटपकरून लोकनेत्याची जयंती साजरी केली. भाजपाचे नेते श्री.विष्णू भाऊ घुले यांच्या संकल्पने तून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप कार्यक्रम आयोजित केला होता.
या प्रसंगी कोल्हेवाडी येथील संरपच सौ.प्रेमला नंदकुमार मिसाळ,उप सरपंच श्रीराम खांडेकर, मा.सरपंच रामराव मिसाळ,मा.सरपंच बाबासाहेब मिसाळ,मेजर सतीश मिसाळ, अशोक खांडेकर,सुरेश आघाव, ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव मिसाळ,सुरेश आंधळे,नंदकुमार मिसाळ मोहन खांडेकर,शंतनू डांगे,धनराज खांडेकर, रमेश कदम,रावण मिसाळ,सखाराम आंधळे, अशोक मिसाळ,मधुकर मिसाळ,आप्पासाहेब आंधळे,शरद खांडेकर, नरहरी खांडेकर ,कृष्णा मिसाळ, आकाश मिसाळ, सुरेश जगताप,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चौरे सर, गरदडे सर,ढवळ शंकर सर,नेमाणे सर,मच्छिंद्र आंधळे व कोल्हेवाडी येथील प्रमुख कार्यकर्ते, भाजपा पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.



