
नवी दिल्ली/प्रतिनिधी
विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल नवनियुक्त अध्यक्षांनी पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.या प्रसंगी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा , माननीय गृहमंत्री अमित शाह तसेच माननीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.तसेच संसदीय दलातील सर्व सन्माननीय सदस्य आणि पक्षाच्या संघटनात्मक पातळी वरील समर्पित कार्यकर्त्यांनी दाखवलेला विश्वास हीच आपल्या साठी मोठी प्रेरणा असून त्याचवेळी मोठे उत्तरदायित्व ही असल्याचे त्यांनी नमूद केले.
आपण संपूर्ण शक्ती, सामर्थ्य व परिश्रमाच्या जोरावर कार्यकर्त्यांसोबत खांद्याला खांदा लावून काम करत पक्षाला अधिक सशक्त,संघटित व प्रगतिशील दिशेने नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.सेवा,संघटन आणि समर्पण या त्रिसूत्रीवर चालत सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून ‘विकसित भारत’ घडविण्याचा मार्ग निश्चितपणे प्रशस्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.या नियुक्ती मुळे भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बळकटीकरणाला नवी दिशा मिळेल,अशी अपेक्षा पक्षातील नेते व कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.दरम्यान भारतीय जनता मजदुर संघाचे राष्ट्रीय सचिव श्री. भाऊसाहेब घोडके, महाराष्ट्र सचिव श्री. धनंजय कुलकर्णी, मराठवाडा सचिव श्री. चंद्रकांत पाटील यांनी नितीन नबीन यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



