लग्नासाठी दोन लाखाची फसवणूक,वधू सह मावशीला न्यायालयीन कोठडी

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील युसूफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोद्री येथील नवरदेवाकडुन दोन लाख घेवून लग्न लागल्या नंतर तीन तासानंतरच पळून जाणाऱ्या नववधू सह तिच्या मावशीला केज न्यायालयासमोर हजर केले असता दोघींनाही १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश केज न्यायालयाने दिले आहेत.
दोन लाख रुपये घेवून लग्न लावल्यानंतर अवघ्या तीन तासानंतरच पळून जाताना नव वधू प्रीती शिवाजी राऊत हिला पोलिसानी ताब्यात घेवून केज न्यायालया समोर हजर केले आसता तीला १० तारखेपर्यंत ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.
मावशी चाकण मध्ये जेरबंद..!
दोन लाख रुपये घेवून फसवणूक केल्याचा गून्हा नोंद होताच तपासी अधिकारी पोलिस उप निरीक्षक भिमराव मांजरे, जमादार धनंजय कारले व एका महिला कर्मचाऱ्यांच्या पथकाने फसवणूक करणाऱ्या मुलीची मावशी असल्याचे सांगितल्या वरून माया सतीश राऊत या मावशी ला पुण्याच्या चाकण परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेवून गुरूवारी दि.११ डिसेंबर नववधू प्रीती राऊत हिची पोलीस कोठडी संपल्यामुळे प्रीती राऊत व मावशी माया सतीश राऊत या दोघींना ही केज न्यायालयात हजर केले असता. दोघींनाही १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश केज न्यायालयाने दिले आहेत.
या प्रकरणातील आणखी २ आरोपी फरार आहेत. त्यांच्या तपासासाठी पथक तैनात केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्र शेंडगे यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

